प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
रामचंद्र श्रीपती देवकाते कृषी अधिकारी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन माहेर संस्थेतील अनाथ मुलांना सुग्रास भोजन व शालेय साहित्य वाटून प्रदीपराव देवकाते व परिवाराने साजरा केला.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्ताने जिल्हा परिषद पुणेचे प्रदीपराव देवकाते व परिवाराने केला.वढू बुद्रुक ता.शिरूर जि.पुणे येथील माहेर संस्थेत देवकाते परिवाराने येऊन त्यांच्यासोबत राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने त्या संस्थेत असलेल्या मुलांनी व संस्थेच्या प्रमुख प्रमुखांनी आनंद व्यक्त केला.याप्रसंगी अरविंदराव थोरात,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना टीडीएफ पुणेचे जिल्हाध्यक्ष प्रा जितेंद्रकुमार थिटे,शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय वढु बुद्रुकचे मुख्याध्यापक चव्हाण सर,मुख्याध्यापक विठ्ठल पवार,मधुकरराव खरात,स्मिता खरात,संदिप मदने,निती मदने,अविनाश धायगुडे,पल्लवी धायगुडे,शितल पाटील,ऐश्वर्या खरबस,अदिरा खरबस,निलेश खरबस,हर्षल मदने,निता मदने,प्रसाद देवकाते,वैशाली देवकाते,यश मदने,ईशानी पाटील,श्रीराज पाटील,अद्वैत यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.