गोलेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.यामुळे भूमिगत असणाऱ्या पाईप लाईनमधून पाणी न जाता रस्त्यावर वाहत होते
गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
गोलेगाव ता.शिरूर परिसरात सायंकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेल्या काही तासात झालेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार केला होता. वारा व विजेचा कडकडाट यामुळे पावसाने चांगला जोर धरला होता.काल झालेल्या मुसळधार पावसात शेतात पाण्याची डबकी साचली होती. तर गावठाण परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.पाण्याचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामपंचायतची असणारी भूमिगत पाईप लाईनमधून पाण्याने तुडुंब भरून वाहत होती.काही ठिकाणी ग्रामपंचायतची भूमिगत असणारी पाईप लाईनमधून पाणी न जाता मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह रस्त्यावर वाहत होता.