शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील पुर्व भागामधील विकासाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण असलेल्या निमोणे, गुनाट व इतर गावांमध्ये एअरटेल नेटवर्कचा तांत्रिक बिघाड होण्याची घटना वारंवार घडत असुन त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.मंगळवार दि. १०डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गेलेली एअरटेल नेटवर्क हे नागरिकांसाठी त्रासदायक ठरले आहे,मोठया प्रमाणात एअरटेल ग्राहक असल्यामुळे काही ग्राहकांचा संपर्क, ऑनलाईन पेमेंट सुविधा,या प्रकाराची गैरसोय मोठया प्रमाणात झाल्याचे चित्र पहावयास मिळाले वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सातत्याने गायब होत आहे,त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करावा,अशीही मागणी होत आहे.निमोणे ही महत्वाची मोठी बाजारपेठ आहे.गावात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट सुविधेत अडथळे येत आहेत. यामागे वीजपुरवठा गायब होणे मुख्य कारण आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोबाईलसेवा बंद पडत आहे.सध्या या भागात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या धुमाकूळ घालत आहे,अशा परिस्थितीत वीज तसेच मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना पोलिस किंवा अन्य मदतकार्याशी संपर्क साधण्यात अडचणी येऊ शकतात.त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासह मोबाईल नेटवर्क उपकरणांची कार्यक्षमता वाढवावी, तसेच एअरटेल नेटवर्क गेल्यामुळे संपर्काचा खोळंबा कायम दूर करावा,अशी मागणी एअरटेल ग्राहक व नागरिकांनी केली आहे.