*=============*काशिनाथ आल्हाट तमाशा अभ्यासक तमाशा पंढरी नारायणगाव*———+——–
शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार
‘अतिशय दुःखद घटना व्हाट्सअपच्या माध्यमातून बशीर भाईंचे निधन झाले.’ “हे आता वाचण्यात आले. अतिशय वाईट वाटले. अनेक वर्षे बशीरभाई बरोबर विविध विषयांच्या संदर्भात तसेच अनेक कलाकारांच्या चरित्रात्मक लेखनाच्या संबंधित चर्चा करण्याचा योग मला अनेक वेळा आला. ” ‘त्यांच्याबरोबर जे काही क्षण , काही मिळाले. ते मी भाग्याचे दिवस समजतो.’ ‘खरं तर ! बशीरभाई आणि स्वर्गीय संगीतरत्न दत्ता महाडिक यांची अतिशय प्रेमाची मैत्री होती. तमाशाच्या कालखंडात संगीतरत्न दत्ता महाडिक बेल्हा मुक्कामी असताना बशीरभाईंच्या बरोबर साथसंगत होती.” संगीतरत्न दत्ता महाडिक यांनी बशीरभाईंना आणि बशीरभाईंनी संगीतरत्न दत्ता महाडिक यांना अनेक वेळा एकमेकांना मदत केल्याची चर्चा ते माझ्याकडे करत. “कलाकारावरती निखळ प्रेम करणारा माणूस म्हणजे बशीरभाई होते. तमाशासृष्टीत कलाकारावर प्रेम करणारा संगीतरत्न दत्ता महाडिक यांच्यासारखे होणार नाहीत. त्याच विचारांचे बशीरभाई होते. “जुन्या काळातील ज्येष्ठ ताशा सम्राट दिलदार मनाचा माणूस व्यक्तिमत्व हरपले!” ‘यांची जाणीव मनाला यापुढे होत राहील. त्यांच्या आयुष्यात त्यांनी विविध क्षेत्रातील अनेक माणसे जोडली. माणुसकीचे नाते कायम ठेवले .”! ‘”ते सतत दुसऱ्याला मोठेपणा देत. दुसऱ्याच्या कलेचे कौतुक करत. कलाकाराच्या पाठीवरती शाबासकी थाप देत. आणि मार्गदर्शन पण करत.” स्वतःचा मोठेपणा त्यांनी कधी लोकांसमोर दाखवला नाही. पारंपारिक कला क्षेत्रातील ताशा वादक एक हरपल्याचा दुःख आपणास ज्याप्रमाणे होईल .” त्याचप्रमाणे त्यांनी आर्थिक सहकार्यचे योगदान देऊन अनेक तमाशा फड उभे केले’. आणि अनेक कलाकारांना शासनाच्या सुविधा मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गावचा जुन्या जाणत्या कलाकारांनी संपूर्ण महाराष्ट्रात बेल्हे गावचे नाव शिखरावरती पोहचवले. त्याप्रमाणे बशीरभाईनी सुद्धा कलेच्या तसेच व्यापार व्यवसायातून बेल्हे गावच्या नावलौकिकात अधिकची भर घातली. ताशा वादनाचा त्यांचा पारंपारिक एक संच होता. उत्कृष्ट ताशा वादक कलेमुळे त्यांना विविध संस्था, संघटनांनी सत्कार, पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. “नजीकच्या काळात राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेच्यावतीने त्यांचा ‘गुणवंत कलावंत’ म्हणून पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांच्या कलेचा गुणगौरव केला होता. ”दररोजच्या नजरेला दिसणारे कलावंत हरपले की,’ नकळत कलेची हानी होत आहे. असं वाटतं” त्यांच्या बरोबरच्या अनेक क्षण चल चित्रपटासारखे नजरेसमोर आले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येतीची फोनद्वारे चौकशी केली होती. ‘कोरोणाच्या काळात बशीरभाईंची आणि माझी कलाकारांच्या आर्थिक परिस्थिती विषयी चर्चा झाली. कलाकार हलाखीत आहेत. अनेक कलाकारांच्या समस्या ते मला सांगत होते.’ या कोरोनाच्या काळात तीन महिने 100 कलाकारांना महिनाभर पुरेल इतके किराणा किट मी वितरित केले . तर महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ कलावंतांच्या बँक खात्यांवरती रु 1000/ते 1500/ रुपये पाठवले होते. त्यावेळी अनेक कलाकारांची माहिती त्यांनी मला दिली. त्यांच्यामुळे प्रत्येक कलाकारा पर्यंत मला जाता आले. संगीतरत्न दत्ता महाडिक यांच्या तमाशा फडातील आचारी (अण्णा) वृद्धावस्थेत आहेत. ते एका शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये सपरात राहतात .त्या माणसाला आर्थिकतेची फार गरज आहे. हे त्यांनी मला सांगितले. मी त्यांच्याकडे पैसे पाठवून दिले.त्यांनी त्यांना पोहोच केले. बशीरभाई अतिशय प्रामाणिक होते. ‘ महाराष्ट्रातील पारंपरिक कला ही टिकली पाहिजे.”! लोककलेचे संवर्धन झाले पाहिजे. ही त्यांची मनस्वी भावना होती. ते सातत्याने सातत्याने प्रयत्न करीत . पुणे आणि नगर जिल्ह्यात पारंपरिक त्यांचा ताशा संच अतिशय गाजलेला होता .सनईच्या सुरात एकदा बशीरभाई वाजवायला सुरुवात केली की, ते एकरूप होऊन जात.एक वेगळे चैतन्य अनेकवेळा त्यांचे पाहण्यास मिळाले. ज्या ज्या ठिकाणी पारंपरिक वाद्य स्पर्धा होत.त्या पारंपारिक वाद्याच्या स्पर्धत पहिल्या क्रमांकाचे ते मानकरी ठरलेले होते. संपूर्ण महाराष्ट्रात आता बेल्हा तमाशा महोत्सवाचा नावलौकिक पोहचला आहे. या तमाशा महोत्सवाचे प्रणेते वसंतराव जगताप (अण्णा)आणि त्यांचे सर्व सहकारी उत्तम नियोजन करून हा महोत्सव संपन्न करतात .परंतु या महोत्सवाचे निमंत्रण हे बशीरभाई आपल्या सर्व मित्रांना , कलाकारांना दरवर्षी महोत्सवाचे निमंत्रण आवडीने देत. महोत्सवाला येण्याचा आग्रह करीत होते. “दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारा माणूस, आपल्यात नाही. , ही खंत कलाक्षेत्रात कायम कायम राहील”!. “राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटीलसंस्थेच्यावतीने ताशा सम्राट बशीरभाई यांना विनम्र अभिवादन”!!!!