..गोलेगाव येथील भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडंट पदी दिग्विजय अनिल वाखारे याची निवड
गोलेगाव प्रतिनिधी: चेतन पडवळ
ता. ५ गोलेगाव ता. शिरूर येथील दिग्विजय अनिल वाखारे याची भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडंट पदी निवड झाली आहे. गोलेगावचे आदर्श शिक्षक डॉ.अनिल व सीमा वाखारे यांचा दिग्विजय मुलगा होत. मागील दोन वर्षात वाखारे परिवारातील हा तिसरा तरुण सुपर क्लास वन अधिकारी झाला आहे दिग्विजय वाखारे व पालकांचे तसेच मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे गोलेगाव ग्रामपंचायत सरपंच दिपाली पडवळ उपसरपंच निलेश बांदल ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.