जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
शिवजन्मभूमी जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरती बेकायदेशीर पार्किंग करणे, विनापरवाना गाडी चालवणे, ट्रिपल सीट गाडी चालवणे त्याचप्रमाणे विना हेल्मेट या सर्व बेकायदेशीर सर्वसामान्य नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहन चालकांवर जुन्नर पोलीस स्टेशनच्या ट्राफिक पोलीस यंत्रणेकडून तीन लाख पंधरा हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अनेक वेळा सूचना देऊन देखील किंवा वाहन चालक कुठल्याही सूचनांचे किंवा नियमांचे पालन करत नसल्यामुळे आणि सद्यस्थितीत निसर्गरम्य जुन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जुन्नर तालुक्यात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी दर्शनासाठी येत असतात.
आता पावसाळा ऋतूत जुन्नरच्या पश्चिमेला नाणे घाटामध्ये अनेक निसर्गप्रेमी पर्यटक नैसर्गिक पाण्याचे धबधबे आणि धुक्याची चादर पांगरलेल्या नाणेघाटाला पाहण्यासाठी पर्यटक येत असतात परंतु त्या ठिकाणी ते आपल्याकडे असलेली वाहने चालवताना निष्काळजीपणा करतात . आणि त्यामुळे अनेक अपघात होतात किंवा होण्याची शक्यता असते अशा वाहनचालकांवर जुन्नर पोलीस स्टेशन नियंत्रण ठेवून वेळप्रसंगी कायदेशीर कारवाई करून सर्वसामान्य जनतेला न्याय देत असतात .
ट्राफिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जुन्नर परिसरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचा अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यामुळे तेथील रस्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
सदर दंडाची रक्कम जुन्नर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार त्याचप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफिक पोलीस विभागाचे प्रमुख वनवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली आहे.