शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भवानी पेठ पुणे, पुणे जिल्ह्यातील सर्व विशेष शिक्षक, सर्व विशेष तज्ञ व सर्व जिल्हा समन्वयक यांना मॉरिस फाउंडेशनच्या वतीने अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी दोन दिवशीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याच परिषदेत दिव्यांग क्षेत्रामध्ये (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी) विशेष कार्य केल्यामुळे मा.श्रीम.डॉ.नेहा बेलसरे प्राचार्य जि.शि.व प्र.सं.पुणे यांच्या हस्ते संदीप सिताराम क्षीरसागर विशेष तज्ञ पंचायत समिती शिरुर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करुन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व त्याचबरोबर जिल्हा व विभाग स्तर नवोपक्रम स्पर्धा सन २०२३ – २०२४ पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमासाठी आलेले सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला त्यामध्ये प्रामुख्याने नामदेव शेंडकर वरिष्ठ अधिव्याख्याता जि.शि.व प्र.सं.पुणे तथा वरिष्ठ प्रकल्प संचालक सारथी पुणे,अर्चना नलावडे,राजश्री तिटकारे अधिव्याख्याता जि.शि.व प्र.सं.पुणे, अश्विनी सोनवणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भोर,मंगेश पावडे प्रशिक्षण समन्वयक, मधुकर क्षीरसागर विषय साधन व्यक्ती, तसेच डॉ अंजली मॉरिस फाऊंडेशन च्या स्वप्ना डमरेला,मंजुषा कुलकर्णी,मुग्धा ढवळीकर,मेधा पाठक व AMF ची सर्व टिम उपस्थित होती या सर्वांच्या उपस्थितीत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शिरुर तालुक्यातील व इतर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार साहित्य साधने,वैद्यकीय मनुष्यबळ,तसेच बहुउद्देशीय संसाधन व संशोधन प्रशिक्षण केंद्र इमारत निर्मिती अशा उत्तम सहयोगाबद्दल संदीप सिताराम क्षीरसागर यांच्या या कामाचा गौरव करण्यात आला व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. त्याच बरोबर सर्व विशेषतज्ञ व सर्व विशेष शिक्षक यांच्या वतीने ही गुलाब पुष्प बुके,शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष बाब म्हणजे फियाट कंपनीच्या संपर्कात राहुन सीएसआर समन्वयक अमोल फटाले सर व वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सीएसआर निधीच्या माध्यमातून शिरूर,हवेली,राजगुरुनगर,आंबेगाव,जुन्नर याचबरोबर आता इतरही तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे हा सन्मान जि.शि.व प्र.सं.पुणे,यांच्या वतीने करण्यात आला.