जरांगे पाटील यांना शिरसगाव काटा येथून पाठिंबा.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे साखळी उपोषण चालू आहे. सकल मराठा समाज बांधवांकडून राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या या लढ्याला बळकट करण्यासाठी शिरसगाव काटा येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत शिरसगाव काटा गावात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंद करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहे.साखळी उपोषणाचा हा पहिला दिवस आहे.यावेळी राहुल कदम, जयदीप पवार , मयूर जगताप, गणेश शिंदे, भरत काटे, गोपाळ काटे ,सागर गराडे, सागर खैरे यावेळी उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button