जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर

महाराष्ट्रातील पुणे-मुंबई प्रमाणे पुणे-नाशिक प्रवास नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत.या प्रवासासाठी पाच ते सहा तासांचाकालावधी लागतात.दोन्ही शहरांमधील जवळपास २२० किलो- मीटर असलेले हे अंतर पार करताना वाहनधारकांनावाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.हा मार्ग द्रुतगती मार्ग नाही.यामुळे अनेक ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. आता पुणे ते नाशिक अंतर कमी होणार आहे.तब्बल ५० किलो मीटरने हे अंतर कमी होणार आहे. तसेच हा मार्गसहा पदरी द्रुतगती मार्ग होणार आहे.यामुळे पुणे-मुंबईमहामार्गाप्रमाणे वेगाने या मार्गावरुन जाता येणार आहे या मार्गावर वाहनांचा वेग वाढून प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. –: असा असणार हा महामार्ग:–पुणे नाशिक द्रुतगती महामार्गाला सुरुवात पिंपरी- चिंचवडच्या तळवडे आणि चिखली लगतच्या म्हाळुंगे येथून सुरू होणार आहे. तसेच नाशिक फाटा ते चाकणपर्यंत असणारा महामार्ग सहापदरी रुंद करण्याचा प्रस्ताव प्रस्तावित आहे. तळवडे येथे हा महामार्ग सुरु होणार असून म्हाळुंगे आंबेठाणकडून कोरेगाव येथे जाणार आहे. कोपरगाववरुन किवळे कडूस- चास घोडेगावपर्यंत हा द्रुतगती महामार्ग असणार आहे. त्यानंतर जुन्नर अकोले संगमनेर येथून नाशिक जिल्ह्यात हा महामार्ग पोहचणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सिन्नरवरुन नाशिकपर्यंत द्रुतगती महामार्ग होणार आहे. —: पुणे नाशिक जवळ येणार:–पुणे नाशिक ही दोन्ही महत्वाची शहरे वेगवेगळ्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पुणे ते नाशिक सेमीहायस्पीड मार्गाची घोषणा करण्यात आली. या रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात अजून सुरु झाले नाही. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याकडे लक्ष दिले आहे. यामुळे लोकसभेच्या 2024 निवडणुकीपूर्वी या महामार्गासंदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन आणि पुणे नाशिक द्रुतगती महामार्गामुळे हे दोन्ही शहरे अधिक जवळ येणार आहेत. भविष्यात पुणे-मुंबई प्रमाणे पुणे नाशिक या दोन्ही शहरांचे महत्व वाढणार आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button